‘सेक्स अँड द सिटी’ मालिकेमध्ये सारा जेसिका पार्करने कॅरी ब्रॅडशॉ नावाचे पात्र साकारले होते. या शोच्या क्रेडिट्समध्ये कॅरी ब्रॅडशॉने परिधान केलेल्या थ्री टायर्ड टुटू स्कर्टचा तब्बल ५२ हजार डॉलर्समध्ये लिलाव झाला आहे. भारतीय रुपयांमध्ये या स्कर्टची ४३ लाख रुपयांमध्ये विक्री झाली. या स्कर्टची मूळ किंमत फक्त पाच डॉलर्स म्हणजे ४१५ रुपये होती.

ज्युलियन्स ऑक्शन्सच्या अनस्टॉपेबल: सिग्नेचर स्टाइल्स आयकॉनिक वुमन इन फॅशन ऑक्शनमध्ये समाविष्ट असलेल्या अनेक वस्तूंपैकी एक हा स्कर्ट होता. हॉलीवूडच्या सुवर्णयुगापासून ते आजच्या ट्रेंडसेटिंग सेलिब्रिटी आणि एन्फ्लुएन्सर्सपर्यंत सर्वाधिक जास्त कमाई करणाऱ्या वस्तूंपैकी हा स्कर्ट एक होता, अशी पीपल डॉट कॉमने वृत्त दिलंय.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत

शोएब मलिकच्या लग्नानंतर सानिया मिर्झाची पहिली पोस्ट; फोटोसह एका शब्दाच्या कॅप्शनने वेधलं लक्ष, चाहते म्हणाले…

ट्यूल स्कर्ट एक पांढरा सॅटिन वेस्टबँड असलेला थ्री टायर (तीन जाळीदार लेयर असलेला) स्कर्ट होता. हा स्कर्ट प्रिन्सेस डायना यांनी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि जॅकी केनेडी यांना भेटण्यासाठी परिधान केला होता.

ब्रॅडशॉच्या स्कर्टवरील विजयी बोली ही लिलावातील सर्वात आश्चर्यचकित करणारी बोली होती, कारण हा स्कर्ट ८ हजार ते १२ हजार डॉलर्समध्ये विकला जाईल असा अंदाज होता. पण तो तब्बल ५२ हजार डॉलर्समध्ये विकला गेला. कारण त्याची मूळ किंमत फक्त ५ डॉलर्स होती. हा स्कर्ट २५ वर्षांहून जास्त जुना आहे. दरम्यान, हा आयकॉनिक टुटू स्कर्ट केवळ एसएटीसीच्या इतिहासाचाच नव्हे तर फॅशनच्या इतिहासाचाही महत्त्वाचा भाग होता.