दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण, पोलिसांच्या आदेशाचा भंग, वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी पुण्याच्या सहकारनगर पोलीस ठाण्यात अभिनेता संतोष जुवेकरसह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर, साऊंड मालक विजय नरुटे आणि अभिनेता संतोष जुवेकरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहीहंडी उत्सवानिमित्त अरण्येश्‍वर मंडळाच्या अध्यक्षाने रस्त्यावर विनापरवाना मंच उभारला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण केले. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे यांनी तक्रार दिली आहे. रहदारीला अडथळा निर्माण केला़ तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी मंडळाच्या अध्यक्षांना कार्यक्रम बंद सांगितले़ त्यांनी कार्यक्रम बंद करण्यास विरोध करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against actor santosh juvekar in pune
First published on: 05-09-2018 at 11:37 IST