कास्टिंग काऊच या वेब मालिकेचा दुसरा एपिसोड नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘फॅन’गर्ल म्हणजेच अभिनेत्री श्रिया सचिन पिळगावकर ‘कास्टिंग काऊच’च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाली. ‘कास्टिंग काऊच’चा पहिला एपिसोड अभिनेत्री राधिका आपटे सोबत करण्यात आला होता. गेल्या ५ एप्रिलला पहिला एपिसोड प्रदर्शित केल्यानंतर तब्बल ३० दिवसांनी दुसरा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे. सुप्रिया पिळगावकर या श्रियाची मोठी बहिण असल्याचं सांगून निपून या एपिसोडची सुरूवात करतो असे यात दाखविण्यात आलेयं. आणि त्यानंतर काय गमती घडल्या असतील हे तर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरचं कळेल.
श्रियाने शाहरूख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटात आर्यन खन्नाचा चाहता असलेल्या गौरवच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: कास्टिंग काउच विथ श्रिया पिळगावकर
सुप्रिया पिळगावकर या श्रियाच्या मोठी बहिण असल्याचं म्हणत एपिसोडची सुरूवात होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 06-05-2016 at 12:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Casting couch with amey nipun episode 02 shriya pilgaonkar