आजचा दिवस उजाडल्यापासूनच मराठी नववर्षास मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. मराठी बांधवांनी त्यांच्या घरावर गुढी उभारून उत्साहात आणि आनंदात नव्या वर्षाचे स्वागत केले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. फक्त मराठी बांधवच नाही तर विविध भाषीय, विविध प्रांतीय जनसमुदायही या आनंदात सहभागी झाल्याचे सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शोभायात्रांमध्ये वाहणारा सळसळता उत्साह आणि तरुणाईचा कल्ला या साऱ्या आनंददायी वातावरणामध्येच कलाकारही मागे नाहीत. गुढी पाडव्याच्या निमित्ताने बऱ्याच कलाकारांनी ट्विरवरुन शुभेच्छा देत काही सुरेख फोटो पोस्ट केले आहेत. अमिताभ बच्चन, अमृता खानविलकर, शशांक केतकर, रितेश देशमुख, मृण्मयी देशपांडे आणि इतरही काही सेलिब्रिटींनी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मृण्मयीने हा फोटो ट्विट करत गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन

अमृता खानविलकर

शशांक केतकर

स्पृहा जोशी

अमेय वाघ

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrities wishes a very happy gudi padwa 2017 amitabh bachchan mrunmayee deshpande amruta khanvilkar
First published on: 28-03-2017 at 13:13 IST