मिलिंद शिंदे या अभिनेत्याने मांडलेलं हृदगत, सलणाऱ्या-बोचणाऱ्या, तुम्हा-आम्हां सर्वांच्या रोजच्या आयुष्यातील विसंगतीवर नेमकेपणानं बोट ठेवत केलेलं हे विचारमंथन खास ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या वाचकांसाठी महिन्यातून दोन वेळा…
एक हे कर…
अलीकडच्या काळात स्वतःच्या पक्षाच्या राजकीय आलेखाचा पडताळा पहाता… हडबडले…
मग असे बरळले की स्वतःच्या पक्षातूनही टीकेचे धनी झाले…
बरळायलाही सीमा असतात त्यांनी त्याही ओलांडल्या…
पक्षप्रतोद म्हणून काही शिष्टाचार असतात, त्या बाबीही लाथाडल्या… काय झाले…?
एक दीदी…
त्या एक दीदी बोलल्या की मला हाच पीएम पाहिजे…
यात रुसायचं, रागवायचं काय आहे?
पण हे रुसले आणि असे काही बरसले.
ज्यांना पक्षानही नाही सावरले…
मान, सन्मान, पुरस्कार मिळत असतात. किंबहुना कलावंत ते स्वतःची कला सिद्ध करून प्राप्त करत असतात.
यांनी तोच सन्मान परत मागितला.
यांचा काय संबंध…?
हे कसे काय मागू शकतात?
मग तुमच्या पक्षाच्या पीएमचा पुरस्कार केला असता, तर काय त्यांना दोन किंवा आणखी एक पुरस्कार दिला असता…?
की लायक नसतांना काहींना पुरस्कार प्रदान केला असता…?
गेल्या साठ-पासष्ठ वर्षांत असं कधी घडलं नाही पण अलीकडे आपण…कुठे चाललोय याची ही फक्त चुणूक आहे…
दुसरे हे कर…
आपल्याला मत द्यायचा, मत् व्यक्त करायचा पूर्ण अधिकार लोकशाहीने दिला आहे… त्याचा आपण वेळोवेळी फायदाही घेतला आहे. (आपण खासदार झालात. फार आग्रही बोलल्याचं स्मरत नाही तरीही) आपल्या रुतब्यामुळे मिळतोही आहे
पण जनमानस आपल्यावर जिव्हाळा व्यक्त करून असताना आपण अशी भूमिका घेणं योग्य आहे का…?
असेलही योग्य…
डॉक्टरला, वकिलाला, इंजिनिअरला आपली राजकीय, सामाजिक भूमिका व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मग कलाकाराला का नाही…? अगदी बरोबर दीदींना तो अधिकार आहेच… निश्चित आहे.
गानकोकीळा आहेत त्या…
मला नेहमी प्रश्न पडतो, ज्याचं उत्तर मी जाणकारांनाही विचारलं.
लोकं त्यांना गानकोकिळा म्हणतात…
पण कोकिळा गातच नाही.
कोकिळ गातो…
गानकोकिळा म्हणता येत नाही, कारण त्या स्त्री आहेत…
तरीही त्यांनी त्या उपाधीला कधीही नाकारलं नाही…
जसा पेडर रोडचा विरोध नाकारला नाही
तसं या उपाधीलाही त्यांनी कधी अव्हेरलं नाही…
असो…
ज्याची त्याची भूमिका…
मोठी माणसं आहेत त्यांच्या मोठ्या (?) भूमिका
आणि हे एक बंगळुरू(कर)
यांनी ‘आपल्याला कामापेक्षा जास्त पगार मिळतो’ म्हणून पगार परत केला आणि त्यांची मानसिक रुग्ण म्हणून तपासणी करण्यात आली.
ता.क.
सचिन तेंडुलकरांना भारतरत्न मिळावं का…?
– मिलिंद शिंदे