झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. मात्र या कार्यक्रमातील एक प्रसिद्ध विनोदवीर हा ब्रेक घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे सागर कारंडे. या कार्यक्रमात सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर कधी पोस्टमन काका बनून रडवलं. मात्र आता सागर कारंडे हा ‘चला हवा येऊ द्या’ मधून ब्रेक घेणार असल्याचे बोललं जात आहे. यामागचे कारणही समोर आलं आहे.

अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या सागरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. सागर हा सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात काम करत आहे. सागर कारंडेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’, या नाटकाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोवर महाराष्ट्रातील सर्व शहरांची नावे लिहिली आहेत. त्यासोबत त्यांनी १०० टक्के मनोरंजन, १०० टक्के उपस्थिती आणि १०० टक्के गंमत असे लिहिले आहे. ‘फॅमिली आमची, मनोरंजन तुमचं’ ही या नाटकाची टॅगलाईन आहे. हा फोटो पोस्ट करताना सागर कारंडेंनी त्याला कॅप्शन दिले आहे. त्या कॅप्शनमध्ये त्याने त्याच्या या नाटकाच्या प्रयोगाची तारीख आणि वेळ याची माहिती दिली आहे.

“आपण वयाने कितीही मोठे झालो तरी…”, श्रेया बुगडेची भाऊ कदम यांच्यासाठी खास पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सागरने ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांना विविध प्रश्न पडले आहेत. सागर ‘चला हवा येऊ द्या’ मधून ब्रेक घेणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र त्याने याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र सागरचे महिनाभराचे शेड्युल पाहता सागर हा नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तो चला हवा येऊ द्या मधून ब्रेक घेणार असल्याचे बोललं जात आहे.