प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला आहे. वॉशिंग्टन डीसी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या अलीकडील सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, दासने देशाच्या कथित दुहेरी चारित्र्याबद्दल भाष्य केल्याचे आणि कोविड-१९ महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते शेतकरी निषेध या मुद्द्यांचा उल्लेख केला. त्याची बोलण्याची शैली लोकांना आवडली असली तरी आता त्याला विरोध केला जात आहे. अनेकांनी वीर दासवर देशाची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप होतोय. यातच प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील नाव न घेता वीर दासवर निशाणा साधलाय.

“मी माझ्या आईशी भांडू शकतो किंवा तिच्यात अनेक दोष शोधू शकतो, पण शेजाऱ्याच्या घरी जाऊन मी तिच्यावर टीका करणार नाही. मला माझ्या देशात शंभर गोष्टी चुकीच्या वाटतील पण मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीरपणे देशावर टीका करणार नाही. असं कदाचित फक्त मीच करत असेन, परंतु काही नको व्हायला,” असं चेतन भगत यांनी ट्विट करत म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चेतन भगत यांच्या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. नीरज घायवान चेतन भगत यांना रिप्लाय देत म्हटलं की, “जेव्हा तुमच्याकडे अपमान करणारे पालक असतात, पण ते बोलतात ते तुमच्या फायद्यासाठी आहेत असा विश्वास ठेवता, तेव्हा इतरांची मदत घेणे हा एकमेव उपाय उरतो.”