सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता, त्यासाठी ओपनहायमर संस्कृत शिकले होते.

या चित्रपटाला पाहिल्याच दिवशी भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्व स्तरातून याचं कौतुक होत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १३ ते १४ कोटींची कमाई केली. ‘ओपनहायमर’ हा भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करणारा पहिला हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

10th Board Exam Topper Heer Ghetiya Dies
१० वीला ९९.७० टक्के मिळवणाऱ्या हीरचा निकालानंतर चार दिवसातच मृत्यू; वडिलांचा निर्णय वाचून मन हळहळेल
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
irfan pathan on ms dhoni batting position
IPL 2024 : धोनीच्या फलंदाजी क्रमवारीवर इरफान पठाणने उपस्थित केले प्रश्नचिन्ह; म्हणाला, “कोणीतरी त्याला सांगावं की…”
virat kohli should open rohit should bat at three says ajay jadeja
कोहली सलामीसाठी योग्य! रोहितने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे; अजय जडेजाचे मत
hybrid fund, hybrid fund types, share market, stock market, conservative hybrid fund, aggressive hybrid fund, sebi, investment in stock market, new investor in stock market, pros and cons of hybrid fund,
‘हायब्रिड’च्या निमित्ताने …
12-year-old child molested by minors
मुंबई : १२ वर्षांच्या मुलावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”

आणखी वाचा : बहुचर्चित ‘टिपू’ चित्रपट झाला डब्बाबंद, निर्मात्यांची मोठी घोषणा; पोस्टरमुळे निर्माण झालेला मोठा वाद

नोलनच्या या चित्रपटाने ३ दिवसांत तब्बल ४९ कोटींचा व्यवसाय केला आहे. टॉम क्रुजच्या ‘मिशन इम्पोसीबल ७’ या चित्रपटाने ५ दिवसांत ६३ कोटींचा व्यवसाय केला होता. त्यामानाने ‘ओपनहायमर’ पुढच्या २ दिवसांत हा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नव्हे तर आयमॅक्स थिएटरमध्ये रात्री १२ आणि ३ वाजताचे शोजसुद्धा हाऊसफुल्ल आहेत.

या चित्रपटातील भगवद्गीता वाचण्याच्या सीनवरुन थोडा वाद निर्माण झाला आहे. काही लोकांनी यासाठी आपल्या सेन्सॉर बोर्डला जवाबदार धरलं आहे. तो वादग्रस्त सीन लवकरात लवकर चित्रपटातून हटवण्याबद्दलही माहिती अन् सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दबाव आणल्याचं सांगितलं जात आहे. नोलनच्या या बहुचर्चित चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.