शाहरुख खानच्या कारकिर्दीत ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे महत्त्वाचे स्थान आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटातून काजोल, राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांच्या अभिनयासोबतच ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचीही बरीच चर्चा झाली होती. कॉलेजमध्ये असताना आपल्या जवळच्या मित्रावर प्रेम करण्याविषयी कधीही विचार न करणाऱ्या अंजलीला (काजोलला) त्याच मित्रावर प्रेम जडते. पण, त्याच्या नजरेत मात्र अंजली फक्त एक चांगली मैत्रीणच असते. किंबहुना त्याला दुसरीच मुलगी आवडत असते. अशात आपल्या मित्रासाठी वाटेल ते करणारी अंजली, टीनाच्या प्रेमात आकंठ बुडालेला राहुल प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतात.
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाच्या कथानकाला कॉलेजच्या वातावरणातच वेग येतो. कॉलेजमधील उत्साही वातावरण, विद्यार्थ्यांशी मिळून मिसळून वागणारे शिक्षक असे एकंदर वातावरण पाहता आपलेही कॉलेज असे असावे हा विचार अनेकांच्याच मनात आला असेल यात शंका नाही. तुमच्याही मनात आलाय का हा विचार? कारण आजच्या सिने’नॉलेज’चा प्रश्न त्याच कॉलेजविषयी आहे…
प्रश्न : ‘कुछ कुछ होता है’मधील शाहरुख (राहुल), काजोल (अंजली)च्या ‘त्या’ कॉलेजचे नाव काय होते?
१. सेंट पीटर्स कॉलेज
२. झेवियर्स कॉलेज
३. झुनझुनवाला कॉलेज
‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट आजही अनेकांच्या आवडीचा आहे. मैत्री, प्रेम, विश्वास या गोष्टींचा आधार घेत एक अनोखी कथा या चित्रपटातून पाहायला मिळाली होती. बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही करण जोहरच्या या चित्रपटाचे नाव घेण्यात येते.
वाचा : ‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’
गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
प्रश्न- अशोक-निवेदिता सराफ यांनी किती चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय?
उत्तर – दहा