निंबाळकर यांच्याकडे होळी आणि रंगपंचमी साजरी झाली खरी पण दीपिकाने तिची नवी खेळी खेळायला सुरुवात केली. प्रेम राधामध्ये हळूहळू अडकत चालला आहे याची कल्पना दीपिकाला येऊ लागते.रंगपंचमीच्या दिवशी प्रेम आणि राधामधील जवळीक बघून दीपिकाने ती गरोदर असल्याचे राधाला सांगितले. हे कळल्यावर राधाला धक्का बसला आणि राधा कोणलाही न सांगता घरा बाहेर निघून गेली. दीपिकाने राधाला काहीतरी नक्कीच सांगितले आहे याची शंका प्रेमला येते पण दीपिका ठामपणे सांगते की तिने राधाला काहीही सांगितले नाही. सगळे घरामध्ये अस्वस्थ असतानाच राधा घरी परतते. राधामध्ये काहीतरी बदल झाला आहे असे प्रेमला वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधा प्रेमला अनपेक्षित प्रश्न विचारते, ज्यामुळे प्रेम पूर्णत: गोंधळून जातो. राधा प्रेमला त्याचं दीपिकावर प्रेम आहे का? असं विचारते आणि प्रेम त्याला नकार देतो, पण राधावर प्रेम आहे की नाही हे अजून कळत नाही असं म्हटल्यावर राधाला तिचे उत्तर मिळाले असं राधा प्रेमला सांगते. परंतु प्रेम तिला आवडू लागला आहे असं ती प्रेमला सांगते. प्रेमचा हा अबोलाच राधाला सगळी उत्तरं देऊन जातो. दीपिकाचं खरं रूप कळल्यानंतर राधा पहिल्यांदा प्रेमच्या बाजूने उभी राहणार आहे. या सगळ्यामध्ये दीपिकाचे स्वार्थी प्रेम जिंकणार की राधाचा विश्वास हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi serial radha prem rangi rangali
First published on: 07-03-2018 at 19:26 IST