करोना विषाणूचं सावट संपूर्ण जगावर आहे. या विषाणूचा भारतातही शिरकाव झाला आहे. त्यामुळे सरकारदेखील नागरिकांना योग्य ती खबरदारी बाळगण्याचं आवाहन करत आहे. तसंच शाळा, महाविद्यालये, मॉल, धार्मिकस्थळे अशी गर्दीची ठिकाणंही बंद ठेवण्यात आले आहेत. यामध्येच ‘करोना विषाणू’ पसरू नये म्हणून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, जाहिराती या साऱ्यांचं चित्रीकरण रद्द केलं आहे. त्यामुळे सध्या ही कलाकार मंडळी घरी आहे. परंतु आता ही कलाकार मंडळी घरी असूनदेखील या वेळेचा सदुपयोग करताना दिसत आहेत.
दरम्यान, काही कलाकार सध्या घरात बसून त्यांचा वेळ कुटुंबासोबत घालवत आहेत. तर काही कलाकार नवनवीन गोष्टी शिकत आहे. विशेष म्हणजे या कलाकारांनी या व्हिडीओच्या माध्यमातून स्वत:ची काळजी कशी घ्यावी हेदेखील सांगितल्याचं पाहायला मिळत आहे.