काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. विराट आणि अनुष्काने इटलीत अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांच्याच आवडीच्या या सेलिब्रिटी जोडप्याचीच चर्चा सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या लग्नसोहळ्यातील वेडिंग प्लॅनरपासून ते अगदी पाहुण्यांची यादी, अनुष्काचे दागिने आणि त्यांच्या हनिमूनपर्यंत सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा झाली.
विराट, अनुष्का दोघंही सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत. त्यात लग्न झाल्यापासून तर या दोघांनीही एकसारखेच फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. अनुष्काने नुकताच त्यांच्या हनिमूनचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये विराटसोबत ती बर्फाच्छादित परिसरात असल्याचे दिसते. आपल्या चाहत्यांसोबत काही आनंदाचे क्षण शेअर करण्याच्या दृष्टीने तिने शेअर केलेल्या या फोटोने अनेकांचेच लक्ष वेधले. हे त्या फोटोवर आलेल्या लाइक्सची संख्या पाहून लक्षातही आले. पण, या फोटोवर अनेकांनी त्यांची विनोदबुद्धी चाळवत त्याची खिल्लीही उडवली.
या फोटोमध्ये विराट आणि अनुष्काचे चेहरे पाहता, ‘हे हनिमूनला गेले आहेत, की क्रोनिकल्स ऑफ नार्निया साकारायला?’, असा प्रश्न एका युजरने विचारला. तर त्याच ट्विटला रिप्लाय देत दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘गेम ऑफ थ्रोन्सचा शेवटचा सीझन लवकरच सुरु होणार आहे वाटतं… .’ विविध परिंनी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये ‘महाराष्ट्रीयन्स मिम्स’ही मागे नाहीत. त्यांच्या फेसबुक पेजवर तर, अनुष्का आणि विराटच्या फोटोचे मॉर्फिंग केले असून, सध्या तो बराच व्हायरलही झाला आहे. त्यामुळे आवडते असो किंवा नसो, सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार होण्यापासून विराट, अनुष्कालाही कोणी वाचवू शकले नाही हेच खरे.
वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…
Ye Honeymoon manane gaye ya Chronicles Of Narnia banane.. pic.twitter.com/054PhH3zn2
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) December 15, 2017
Lagta Game of Thrones final season jaldi shuru hone wala hai
— Bahadur 3.0 (@my2bit) December 15, 2017
Ye itne white kaise ho gaye h? Honeymoon mana rahe ya baith k photo me filter laga rahe
— Vivek (@userNAvailable) December 15, 2017
Imported Mushroom
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Madhu (@MadhuDADA) December 15, 2017