मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अनलॉकची हाक देत टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनलॉकच्या पहिल्याच टप्प्यात राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत असून अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर या दोघींनी नृत्याच्या माध्यमातून या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फुलवा खामकर आणि उर्मिला कोठारे यांनी Unlock Your Passion असं म्हणतं या अनलॉकचं स्वागत केलं आहे. या दोघींनीही आपआपल्या घरी राहून डान्सचा व्हिडीओ शूट केला आहे. विशेष म्हणजे या दोघींची जुगलबंदी प्रेक्षकांचं मनं जिंकत आहे.

फुलवा आणि उर्मिलाने हसता हुआ नुरानी चेहरा या गाण्यावर डान्स केला आहे. या डान्सचमध्ये त्यांच्या दिलखेचक अदा पाहायला मिळत आहे. या डान्सचा व्हिडीओ उर्मिलाने ट्विट आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याच्या लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance choreoghrapher phulwa khamkar and actress urmila kothare posts a dance video saying unlock your passion ssj
First published on: 10-06-2020 at 08:30 IST