‘ते रहस्य तुझ्यासोबतच गेलं’; सुशांतसाठी भूमिकाची भावनिक पोस्ट

सुशांतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भूमिका चावलाची पोस्ट

sushant bhumika
सुशांत सिंह राजपूत, भूमिका चावला

‘तू जाऊन आठवडा झाला. कशामुळे तू टोकाचं पाऊल उचललंस? ते रहस्य तुझ्यासोबतच गेलं’, अशा शब्दांत अभिनेत्री भूमिका चावलाने सुशांत सिंह राजपूतसाठी भावना व्यक्त केल्या. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात भूमिकाने सुशांतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर तिने एक मोठी पोस्ट लिहिली असून लोकांनाही तिने उणीधुणी काढत न बसता प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे.

काय आहे भूमिकाची पोस्ट?

‘प्रिय सुशांत… तू जिथे कुठे असशील, देवाच्या सहवासात असशील. तू जाऊन आठवड झाला. कशामुळे तू आत्महत्या केलीस, ते रहस्य तुझ्यासोबत निघून गेलं. मी लोकांना विनंती करते त्यांनी स्वत:ची काळजी घेण्यात, तुमच्याभोवती असलेल्या लोकांची काळजी घेण्यात वेळ घालवावा. हे कशामुळे घडलं याविषयी बऱ्याच चर्चा सुरू आहेत. एकमेकांची उणीधुणी काढली जात आहेत. याला कोण जबाबदार आहे, इंडस्ट्रीमुळे झालं का, नात्यांमुळे हे घडलं का असे बरेच प्रश्न आहेत. लोकांनी त्या आत्म्याचा आदर करावा, प्रार्थना करावी आणि एकमेकांची काळजी घेण्यात वेळ घालवावा. ज्या मुलांना शिक्षणाची गरज आहे त्यांची काळजी घ्या. सर्वांसाठी प्रार्थना करा, सकारात्मक राहा. इतर लोकांवर टीका करू नका. एकमेकांचा आदर करा. या घटनेमागचा उपाय इंडस्ट्रीलाच काढू द्या आणि त्याविषयी अशा प्रकारे सार्वजनिक चर्चा करू नका.’

आणखी वाचा : जेव्हा सुशांतने घडवली होती धोनीच्या मुलीशी अंकिताची भेट; फोटो होतायत व्हायरल

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून नवीन वाद सुरू झाला आहे. या एकंदरीत वादाच्या पार्श्वभूमीवर भूमिकाने ही पोस्ट लिहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dear sushant singh rajput the secret has gone with you bhumika chawla remembers ms dhoni co star ssv