बॉलीवूड अभिनेत्रींच्या जाहिरातींमध्ये घट?

मोठमोठय़ा ब्रॅण्डसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चौघींच्या जाहिराती तात्पुरत्या का होईना थांबवण्याचा विचार कॉर्पोरेट विश्वात सुरू आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येच्या तपासापासून सुरू झालेले वादळ अमली पदार्थाच्या सेवन आणि व्यापाराच्या निमित्ताने बॉलीवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींवर घोंघावू लागले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आघाडीच्या अभिनेत्रींची चौकशी केल्याने त्यांच्या जाहिरातीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.  अमली पदार्थविरोधी पथकाकडून दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकु ल प्रीत सिंग या आघाडीच्या अभिनेत्रींची चौकशी झाली.  मोठमोठय़ा ब्रॅण्डसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चौघींच्या जाहिराती तात्पुरत्या का होईना थांबवण्याचा विचार कॉर्पोरेट विश्वात सुरू आहे. काही जाहिरातींचे प्रसारण सध्या थांबवण्यात आले असून या चौघींचाही जाहिरातविश्वातील भाव कमालीचा घसरणार असल्याची चर्चा सुरू आहे. बॉलीवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रींपैकी सर्वाधिक जाहिराती किं वा ब्रॅण्डशी जोडली गेलेली अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणचे नाव घेतले जाते. दीपिका सध्या विविध १९ ब्रॅण्ड्सचे प्रतिनिधित्व करत आहे. तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूरही मोठमोठय़ा ब्रॅण्ड्सशी जोडल्या गेल्या आहेत. एखादा कलाकार वादविवादात सापडला की आपोआप त्याची लोकांच्या मनातली प्रतिमा डागाळते आणि त्याचा परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर होतो, असे मत ‘करी नेशन’ या जाहिरात कंपनीच्या प्रीती नायर यांनी व्यक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Decline in advertisements of bollywood actresses abn

ताज्या बातम्या