काही चित्रपटांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘ये जवानी है दिवानी’. या चित्रपटातील नैना आणि बनीच्या भूमिकेतील दीपिका पदुकोण, रणबीर कपूरने प्रेक्षकांची मनं जिंकली. रणबीर-दीपिकाच्या ब्रेकअपनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे चित्रपटाची क्रेझ फार होती. यातील गाणी, संवाद, रणबीर-दीपिकाची केमिस्ट्री, कथा एकंदर सगळ्याच गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. रणबीर-दीपिका आता ऑफस्क्रीनसुद्धा चांगले मित्र आहेत. याचीच एक झलक दीपिकाच्या इन्स्टास्टोरीमधून झळकली.
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला आहे. वॅनिटी व्हॅनिटीमध्ये रणबीरसोबत डान्स करतानाचा हा व्हिडिओ आहे. ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील गाजलेल्या ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर हे दोघे डान्स करत आहे. कुठल्यातरी शूटिंगच्या फावल्या वेळेत त्यांनी डान्सचा आनंद लुटल्याचं दिसत आहे.
https://www.instagram.com/p/ByH–i7BVPt/
ब्रेकअपनंतरही रणबीर-दीपिकाने मैत्री कायम ठेवली. रणवीर सिंगशी लग्न केल्यानंतरही दीपिकाने रणबीरसोबत काम केलं. या दोघांचं एकत्र काम करण्यावर माझा काहीच आक्षेप नाही, असं रणवीरनेही स्पष्ट केलं होतं.