बॉलिवूडची लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये ग्रॅण्ड वेडिंग करणाऱ्या या जोडप्याच्या लग्नाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगते. लवकरच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार असून त्यांनी लग्नाचा वाढदिवस खास पद्धतीने सेलिब्रेट करण्याचं ठरवलं आहे. सहाजिकचं चाहत्यांनादेखील त्यांचा अॅनिव्हर्सरी प्लान जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता आहे. त्यातच त्याचा प्लान लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीप-वीरने ठरविल्याप्रमाणे ते खास पद्धतीने त्याची अॅनिव्हर्सरी साजरी करणार आहेत. त्यांनी आखलेल्या योजनेनुसार, प्रथम ते तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांच्यासोबत असणार आहेत. तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर पद्मावती मंदिरातही जाणार आहेत. हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराच्याच जवळ आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तिर्थस्थळांचं दर्शन घेतल्यानंतर ते अमृतसरमधील सुवर्णमंदिर येथे जाणार आहे. त्यानंतर १५ तारखेला ते परत मुंबईमध्ये परततील.

दरम्यान, दीपिका-रणवीर यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांची ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडते. रामलीला या चित्रपटानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सध्या दोघंही त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. दीपिका लवकरच छपाक चित्रपटात झळकणार आहे. तर रणवीरचा 83 मध्ये झळकणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone and ranveer singh 1st wedding anniversary plan details ssj
First published on: 13-11-2019 at 13:52 IST