लग्नाला आलेल्या पाहुण्यांना दीप-वीरनं दिली ही खास भेट

लग्नासाठी उपस्थित असलेल्या कुटुंबीयांना आणि मित्रपरीवाराला देण्यासाठी दीपिका- रणवीरनं खास भेटवस्तू तयार करून घेतली आहे.

बॉलिवूडमधलं सर्वात लोकप्रिय जोडपं दीपिका आणि रणवीर सिंग भवनानी यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. इटलीत संपन्न झालेल्या विवाहसोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबातले मोजकेच लोक उपस्थित होते. या लग्नासाठी उपस्थित असलेल्या कुटुंबीयांना आणि मित्रपरीवाराला देण्यासाठी दीपिका- रणवीरनं खास भेटवस्तू तयार करून घेतली आहे.

ही भेटवस्तू म्हणजेच हातानं तयार केलेली आणि चांदीचा मुलामा दिलेल फोटो फ्रेम होय. एका गिफ्टिंग कंपनीला पाहुण्यासाठी खास भेट तयार करण्यास दीप-वीरनं सांगितलं होतं. साध्या पण तितक्याच सुंदर अशा या फ्रेमसोबत दीप-वीरनं प्रत्येक पाहुण्यासाठी स्वत:च्या हातानं चिठ्ठी देखील लिहिली होती. या फोटो फ्रेम्सचं डिझाइन केवळ दीप-वीरच्या पाहुण्यापुरताच मर्यादीत राहणार आहे.

https://www.instagram.com/p/BqfgI1QnzFK/

या कंपनीनं दीप- वीरनं पाहुण्यांना दिलेल्या भेटीचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. दीपिका आणि रणवीर यांचा पारंपरिक कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं विवाहसोहळा पार पडला. या दोघांनी २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी बॉलिवूड आणि इतर मित्रपरिवारासाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone and ranveer singh gave gift to guest

ताज्या बातम्या