लवकरच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटातून जवळपास २ वर्षांच्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण ‘पठाण’ चित्रपटासाठी दीपिका तगडं माधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिकाने या चित्रपटासाठी जवळपास १४ ते १५ कोटी मानधन घेतले आहे. ‘दीपिका ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे. आता यश राजच्या पठाण चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबत ती काम करणार आहे. दीपिका पुढच्या वर्षी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. ती या चित्रपटासाठी जवळपास १४ ते १५ कोटी रुपये मानधन घेणार आहे’ असे वृत्तामध्ये नमूद केले आहे.

जॉन अब्राहमने देखील चित्रपटासाठी तगडं मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते. त्याने जवळपास २० कोटी रुपये मानधन घेतले आहे. नोव्हेंबर महिन्यात ‘पठाण’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार होते. मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाचे चित्रीकरण हे मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. दीपिका आणि जॉन पुढच्या वर्षी चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. हा चित्रपट एक अॅक्शन चित्रपट असणार आहे.

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसात शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांच्या ब्रेक नंतर आता शाहरुख पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपटात शाहरुख आणि जॉन ही जोडी पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone is charging huge amount for pathan avb
First published on: 08-11-2020 at 15:19 IST