अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्याची चाहत्यांची फार इच्छा आहे. ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’नंतर आता पुन्हा एकदा ही बहुचर्चित जोडी एकत्र झळकणार असल्याचं कळतंय. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये ही जोडी ऑनस्क्रीनसुद्धा पती-पत्नीच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या इतिहासामध्ये २५ जून १९८३ ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे १९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह हा तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत असणार आहे. तर ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार दीपिकाला कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं आहे. दीपिकाने या भूमिकेला अद्याप होकार दिला की नाही हे गुलदस्त्यातच आहे.

या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं असून ‘चक दे इंडिया’चे दिग्दर्शक कबीर खान यांनीच ‘८३’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रणवीर क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका वठवत असल्यामुळे या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्यासाठी तो कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone offered the role of ranveer singh onscreen wife in kapil dev biopic
First published on: 08-01-2019 at 09:46 IST