आपले आवडते कलाकार सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत काय करतात? हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याला असते. त्यात आता बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दीपिका पदूकोणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात दीपिकाने तिच्या डेली रूटीन बद्दल सांगितले आहे.
हा व्हिडीओ दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला दीपिका मुंबईतील सगळ्यात लोकप्रिय शॉपिंग स्ट्रीट कॉजवेत दिसली. पुढे दीपिका तिच्या डेली रूटीनबद्दल सांगते. दीपिकाच दोन दिवसांच रूटीन हे कधीच सारखं नसतं. तिची सकाळची दिनचर्या ही ठरलेली आहे. ती सकाळी उठल्यावर पहिले दात घासते, अंघोळ करते, मग नाष्टा करते. दीपिकाला तिच्या दिवसाची सुरूवात शांततेत करायला आवडते. नंतर दिवसातून एकदा ती वर्कआउट करते. त्याशिवाय तिचे शेड्युल हे प्रत्येक दिवसानुसार बदलत असते. तिच्यासाठी दोन दिवसांचे रूटीन कधीच सारखे नसते.
View this post on Instagram
पुढे दीपिकाला विचारण्यात आलं की तू खूप प्लॅन करतेस का सगळं? त्यावर दीपिकाने मजेशीर उत्तर दिलंय. ‘हो आणि नाही’. दीपिका म्हणते’ “माझा एक भाग असाय ज्याला सगळ्यागोष्टी प्लॅन केलेल्या आवडतात तर दुसऱ्या भागाला जसं सगळं चालू आहे तसं करण्याची इच्छा होते.”
दीपिकाचा ’83’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पती रणवीर सोबत दिसणार आहे. ५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. याआधी दीपिका ‘छपाक’ चित्रपटात दिसली होती.