सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग यांच्याकडे आदर्श पती पत्नी म्हणून पाहिले जाते. अनेकदा दीपिका मुलाखतींमध्ये रणवीरचा उल्लेख करताना दिसते. मात्र रविवारी १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुलाखतीमध्ये दीपिकाने रणवीर विषयी बोलताना अचानक घाबरुन ‘तो आला तर नाही ना?’ असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये रविवारी १३ ऑक्टोबर रोजी ‘जियो मामी मूवी मेला विथ स्टार्स २०१९’ हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री दीपिका पदूकोण राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांच्यासह तेथे हजर होती. दरम्यान दीपिकाला रणवीरची काम करण्याची स्टाईल आणि तो प्रत्येक भूमिकेसाठी घेत असलेल्या तयारी बद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर दीपिकाने रणवीरची नक्कल करत मजेशीर उत्तर दिले आहे.

‘चित्रपटातील भूमिकेमुळे रणवीर स्वत:ला पूर्णपणे बदलतो. त्याची गाडी, त्याचा परफ्यूम, चालणं, बोलणं, सगळं बदलतो. तो सेटवर एण्ट्री करतानाही त्या पात्राच्या रुपातच करतो’ असे दीपिका म्हणाली. बोलता बोलता दीपिका अचानक थांबली. वळू मागे पाहू लागली आणि म्हणाली ‘तो आला तर नाही ना?’ दीपिकाची ही प्रतिक्रीया पाहून सर्वत्र हस्याची लाट पसरली.

‘जर रणवीर चित्रपटात खिलजीची भूमिका साकारणार असेल तर तो सेटवर पण खिलजीच्या भूमिकेत वावरतो. त्याच अंदाजात बोलतो. तो पूर्णपणे त्या पात्रामध्ये स्वत:ला वाहून घेतो आणि तसाच वागू लागतो. बऱ्याच वेळा मी रणवीरची या गोष्टीमुळे खिल्ली उडवते’ असे दीपिका पुढे म्हणाली.

आणखी वाचा : कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दीपिकाने केला खास प्लान

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दीपिका रणवीरची पत्नी असल्याचे सांगायला विसरली होती. ‘लिव्ह लव लाफ’ फाऊंडेशनच्या लेक्चर सीरिज लॉन्चसाठी दीपिका दिल्लीला पोहोचली होती. दरम्यान तिने ती एक मुलगी, बहिण आणि अभिनेत्री असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर कोणीतरी मागून दीपिकाला ती एक पत्नी असल्याची आठवण करुन दिली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone talk about ranveer singh in jio mami movie mela with star avb
First published on: 14-10-2019 at 10:38 IST