दीपिकाचा पहिला वहिला हॉलीवूड सिनेमा तो ही हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डिझेल सोबत त्यामुळे दीपिकाच काय पण तिचे जगभरातील तमाम चाहते तिच्या या सिनेमाची वाट बघत आहेत. दीपिकाने यापूर्वी ‘xxx : द रिर्टन ऑफ झेंडर केज ‘ या सिनेमातील तिचे विन सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते त्यामुळे तिच्या चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सोमवारी दीपिकाने या चित्रपटाचा टीझरही शेअर केला.
यातून काही सेंकदाची का होईना चित्रपटाची झलक दिसली. ‘xxx : द रिर्टन ऑफ झेंडर केज’ चा टीझर दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये दीपिका काही अॅक्शन सीन करताना दिसते आहे. अॅक्शन सीन करण्यासाठी दीपिकाने दिवसरात्र मेहनत घेतल्याचेही तिने सांगितले. टीझर शेअर केल्यानंतर आपल्या बोल्ड अंदाजाने अगदी काही मिनिटांत दीपिकाने चाहत्यांची मने जिंकली. विन डिझेलने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.
दोन दिवसांनंतर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे त्यामुळे दीपिका आणि विनचे चाहते या सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पुढच्या वर्षी २० जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.