ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नेटकऱ्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना वैतागून ट्विटरला रामराम केला. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वीच धर्मेंद्र यांनी ट्विटरवर पदार्पण केलं होतं. मात्र ट्रोलर्सच्या नकारात्मक प्रतिक्रियांना वैतागून त्यांनी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला.
‘मित्रांनो, मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. मी एका छोट्याशा वाईट कमेंटनेही दुखावलो जातो. कारण मी अत्यंत संवेदनशील व भावूक व्यक्ती आहे. मी यापुढे तुम्हाला आणखी त्रास देणार नाही,’ अशी पोस्ट लिहित त्यांनी ट्विटर सोडलं. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं या पोस्टमधून स्पष्ट होत आहे.
Friends, love you all, I get hurt by a single small bad comment . I am an emotional person,So I won’t trouble you any more pic.twitter.com/MnAnPY1POM
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 10, 2019
धर्मेंद्र यांनी ट्विटर सोडल्यावर अनेकांनी त्यांना पुन्हा सोशल मीडियावर येण्याची विनंती केली. चाहत्यांच्या या प्रेमाखातर त्यांनी ट्विटरवर पुनरागमनसुद्धा केलं. ‘तुमच्या प्रतिक्रिया वाचून मन भरून आलं. तुमच्या प्रेमासाठीच मी अभिनेता झालो,’ असं त्यांनी नव्या ट्विटमध्ये लिहिलं.
Aap sab ko padte padte…mann bhar aya…..Aap KI mohabbat paane ke liye actor bana tha ….Ji bhar ke…jo di hai mujhe aap ne …..tanhaiyaan …..suni ho chali thien ….aap se door …..ab kiya jaon ga…..kahan jaon ga ………A big hug to you all. pic.twitter.com/neaudIqSc2
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 11, 2019
सध्या धर्मेन्द्र यांनी अभिनयातून विश्रांती घेतली आहे. १९६० साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेद्र यांनी आतापर्यंत सुमारे २५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.