८० च्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट करणारे अभिनेता धर्मेंद्र गेल्या बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहेत. सध्या ते त्यांचा बराचसा वेळ फार्महाऊसवर घालवतात. तसंच त्यांच्या फार्महाऊसवरील अनेक फोटो, व्हिडीओज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या नव्या घराची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांचा नवा बंगला गावात बांधला असून त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांचा नवा बंगला दिसत आहे. यामध्ये त्यांचं मोठं गार्डन, कारंजे आणि गार्डनमध्ये काही मुर्ती बसविल्याचं दिसून येत आहे. हे सारं पाहिल्यानंतर त्यांनी बंगल्याच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये ते स्वत:देखील दिसून येत आहेत.

“हे सारं त्याने दिलं आहे आणि एक दिवस तो गपचूप सारं काही घेऊन जाईल. आयुष्य फार सुंदर आहे मित्रांनो, आयुष्य मजेत आणि भरभरुन जगा”, असं कॅप्शन धर्मेंद्र यांनी या व्हिडीओला दिलं आहे.


धर्मेंद्र यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत ८२ हजार २२२ व्ह्युज मिळाले आहेत. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी १९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. तर ‘यमला पगला दिवाना फिर से’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmendra share his farm house bungalow video on social media ssj
First published on: 06-12-2019 at 13:01 IST