प्रेक्षकांना बराच काळ प्रतिक्षा करायला लावणाऱ्या ‘धूम-३’ ची अधिकृत झलक प्रसिध्द झाली असून, “हे वर्ष ‘धूम-३’ सोबत संपणार” हा मजकूर असलेले व पिळदार शरिरयष्ठी असलेल्या अमिरखानचे पाठमोरे पोस्टर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अमिर खान ‘धूम-३’ मधून पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या आधी २००४ मध्ये सुरू झालेल्या धूमच्या पहिल्या भागामध्ये जॉन अब्राहम व दुसऱ्यामध्य़े हृतिक रोषन यांनी नकारात्मक भूमिका केल्या आहेत.
‘धूम-३’ मध्ये अमिरच्या गुन्ह्यांमध्ये भागघेण्याचे धाडस कतरिना कैफने दाखवले असून, कतरिना अमिरच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे.
चित्रपटात दाखविण्यात आलेल्या अमिरच्या चोरीकरण्याच्या लिला नक्कीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.
नेहमी प्रमाणे अभिषेक बच्चन आणि चोर-पोलिस खेळामध्ये त्याला मदत करणारा उदय चोप्रा देखील या चित्रपटात दिसणार आहेत.
विजयकृष्ण आचार्य लिखित व दिग्दर्शीत ‘धूम-३’ ची निर्मिती आदित्य चोप्राने केली आहे. या ख्रिसमसला ‘धूम-३’ प्रदर्शित करण्याचा दिग्दर्शक व निर्मात्यांचा मानस आहे.

पहा ‘धूम-३’ चा मोशनपोस्टर: