अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. या तपासकार्यात अनेक गोष्टींचा खुलासा होत असून सध्या कलाविश्वातील ड्रग्स पार्टी हा नवा मुद्दा चर्चेत आला आहे. याप्रकरणी अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी कंगनाला चांगलेच खडे बोल सुनावले होते. त्यानंतर अनेकांनी जया बच्चन यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. यात अभिनेत्री दिया मिर्झाने देखील प्रतिक्रिया दिली असून जया बच्चन यांची पाठराखण केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून दिया मिर्झा सातत्याने कलाविश्वात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत आबे. यामध्येच आता तिने जया बच्चन आणि कंगना यांच्याच सुरु असलेल्या शाब्दिक वादात उडी घेतली आहे. दियाने ट्विट करत तिचं मत मांडलं आहे.


“जयाजी, एकदम बरोबर म्हणालात तुम्ही. त्यांनी आपल्या कलाविश्वाशी निगडीत मुद्द्यावर चर्चा केली यासाठी मी मनापासून त्यांची आभारी आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाजकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. कलाविश्वाने सरकारचीदेखील मदत केली आहे. त्यामुळे आमच्या इंडस्ट्रीविषयी असा द्वेष करणे हे अत्यंत चुकीचं आणि गैर आहे”, असं ट्विट दियाने केलं आहे.

वाचा : सुशांत सिंह प्रकरण : फार्महाऊसवरील पार्ट्यांमध्ये सारा अली खानची उपस्थिती; मॅनेजरचा खुलासा

दरम्यान, दियाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जात आहे. सभागृहात शून्य प्रहरामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं होतं. “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा”, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सध्या व्यक्त होताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dia mirza tweet on jaya bachchan speech says vilification of film industry is unjust and condemnable ssj
First published on: 16-09-2020 at 09:14 IST