बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही काळात आपल्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील फोटो आणि वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींमुळे जास्त चर्चेत असते. अलिकडेच ती जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमामध्ये पर्यावरण आणीबाणीविषयी (Climate Emergency) बोलताना अचानक तिला रडू कोसळलं. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन दियाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिया मिर्झा पर्यावरणप्रेमी असून ती अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असते. त्यामुळेच पर्यावरण आणीबाणीचा विषय निघाल्यावर तिला अश्रु अनावर झाले. यावेळी “कोणाच्याही वेदना, त्रास समजून घ्या आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्या. एक गोष्ट नक्की समजून घ्या, हे सुंदर आहे आणि हीच आपली खरी ताकद आहे. आपण जसे आहोत तेच खरं आहे हा कोणताही परफॉर्मंन्स नाहीये”, असं दिया म्हणाली. यावेळी तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून एका व्यक्तीने तिला टिश्यूपेपर दिला. मात्र,” मला टिश्यूपेपर नकोय”, असं दिया म्हणाली.

वाचा : रितेशने विचारलं अबरामकडून काय शिकलास? शाहरुखने दिलं ‘हे’ उत्तर

दरम्यान, दिया प्रचंड पर्यावरण प्रेमी असून ती वाढत्या प्रदुषणाबाबत कायम तिचे विचार सोशल मीडियावर व्यक्त करत असते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील आरे जंगल तोडण्याच्या प्रकरणीही तिने ठाम भूमिका घेत विरोध केला होता. तसंच ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिम बीचवर चित्रपट निर्माती प्रज्ञा कपूर यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहीमेमध्येही दियाने सहभाग घेतला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dia mirza weeping while speaking on climate emergency at jaipur lit fest ssj
First published on: 28-01-2020 at 11:57 IST