‘कितने अजीब रिश्ते है यहा पे…’ या गाण्याच्या ओळी नात्यांच्या समीकरणाला अगदी अचूकपणे मांडतात. पण, आता हे गाणं अनेकांना एका वेगळ्याच कारणासाठी आठवतंय असंच म्हणावं लागेल. सध्याच्या घडीला अचानकच कलाविश्वातील नात्यांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांचं नातं. मनिष आणि करणमध्ये असणारं मैत्रीचं नातं सर्वांनाच ठाऊक आहे. पण, त्यापलीकडे जाऊनही त्यांच्या नात्याची आणखी एक बाजू आहे, जी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतेय.
‘पिंकव्हिला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार खुद्द मनिष मल्होत्रानेच करणसोबतच्या नात्याला दुजोरा दिल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच करणचा वाढदिवस पार पडला. त्यावेळी मनिषने सोशल मीडियावर करणसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने ‘तुमची जोडी किती क्यूट आहे’, ‘तुम्ही क्युटेस्ट कपल आहात’ अशी कमेंट केली. ज्याने अनेकांचच लक्ष वेधलं. या कमेंटमध्ये गैर काहीच नाही. पण, मनिषने ती कमेंट लाईक केल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मनिषने पोस्ट केलेल्या या फोटोवर अनेकांनीच कमेंट करत त्या दोघांची जोडी किती छान आहे आणि ते कसे एकमेकांना शोभून दिसतात याविषयीच्याच कमेंट केल्या. एकदोन युजर्सनी तर मनिष आणि करणला लग्न करण्याचाही सल्ला दिला. त्यामुळे आता त्यांच्या या नात्याचं गुपित नेमकं आहे तरी काय हेच जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
वाचा : मेसेंजरपासून सुरु झालेल्या रिलेशनशिपमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीला गवसलं तिचं अस्तित्वं
करण आणि मनिषच्या नात्याविषयी चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, मुळात नात्यामागचं खरं गुपित हे त्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणी जाणत नाही, हेसुद्धा तितकच खरं. करण आणि मनिष एकमेकांना डेट करत आहेत की नाही, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात असली तरीही त्यांच्या मैत्रीविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. जवळपास २५ वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत असून, त्यांच्या या मैत्रीमुळेच बी- टाऊनचे ‘बीएफएफ’ अशीही त्यांची ओळख आहे.