बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित ‘रईस’ सिनेमाचा ट्रेलर ७ डिसेंबरला प्रदर्शित झाला. काही तासातच या सिनेमाच्या ट्रेलरने अनेक रेकॉर्ड तोडलेही. १० डिसेंबरच्या सकाळपर्यंत या ट्रेलरला अंदाजे १ कोटी ६९ लाखवेळा पाहण्यात आले आहे. या ट्रेलरमध्ये किंग खान एका कुख्यात गुंडाची भूमिका करताना दिसत आहे. दमदार संवाद, अॅक्शन आणि प्रेमकथा असा भरपूर मालमसाला या सिनेमात असणार यात काही शंका नाही. पण किंग खानच्या या जादूई ट्रेलरमध्ये एक मोठी चूक मात्र लोकांच्या लक्षात आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेलरच्या सुरुवातीलाच दारुच्या बाटल्यांवरुन एक बुल्डोजर फिरवताना दाखवण्यात आले आहे. पण लक्ष देऊन बघितले तर लक्षात येते की रॉयल स्टॅग कंपनीच्या या बाटल्या आहेत. ‘रईस’ सिनेमात १९८० चा काळ दाखवण्यात आला आहे. पण ही कंपनी मात्र १९९५ मध्ये स्थापन करण्यात आलेली.

या त्यांच्या चुकांना आपण शाहरुखच्याच भाषेत बोलायचे झाले तर ‘बड़े-बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं।’ दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीही चर्चा होती की ‘रईस’मधील माहिराच्या भूमिकेसाठी तिच्याऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. पण, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रितेश सिधवानीने हे स्पष्ट केले होते की, ‘या चित्रपटातील माहिरावर चित्रीत एकाही दृश्यावर कात्री चालविण्यात आलेली नाही’.

या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान माहिरा सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर येणार का? असा प्रश्न विचारला असता या चित्रपटाच्या निर्मात्यांतर्फे सांगण्यात आले की, ‘जर गरज असेल तर माहिरा नक्कीच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होईल. सरकारतर्फे अजून असा कोणताही नियम बनवण्यात आला नाहीये, की त्या कलाकारांना आपल्या देशाचा व्हिसा मिळू नये. त्यामुळे जर गरज वाटली तर ती नक्कीच प्रमोशनदरम्यान दिसू शकेल’.

२५ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणाऱ्या रईस सिनेमात शाहरुखसोबत नवाझुद्दीन सिद्दीकी आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानही दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राहुल ढोलकिया याने केले आहे. या सिनेमाची निर्मिती रितेश सिद्धवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एण्टरटेनमेन्ट आणि शाहरुख आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज् एण्टरटेनमेन्टने केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you notice this big mistake in srk raees trailer
First published on: 10-12-2016 at 13:43 IST