बाहुबली आणि RRR सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. ते रणबीरचा हा चित्रपट दक्षिणेतील राज्यांमध्ये पोहोचवण्यासाठी टीमसमवेत प्रमोशनसाठी फिरत आहेत. यादरम्यान ते अनेक मुलाखतीही देत ​​आहे. याशिवाय, ते त्यांच्या पुढील चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनच्या कामातही व्यग्र आहे. लवकरच राजामौली दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूला घेऊन एक चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाचं शुटिंग आगामी काळात सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या राजामौलींना एका दिग्गज अभिनेत्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. एका मुलाखतीत त्यांनी त्यांची ही इच्छा बोलून दाखवली.

आलियावर केलेल्या ‘त्या’ विनोदाबद्दल रणबीरने मागितली जाहीर माफी; म्हणाला, “माझ्या चेहऱ्यावरील हावभाव…”

तुम्हाला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा आहे, असा प्रश्न राजामौलींना विचारण्यात आला होता. यावर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता रजनीकांत यांचे नाव घेतले. तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांना एकदा चित्रपटात डायरेक्ट करायला नक्कीच आवडेल, असे दिग्दर्शक राजामौली यांनी सांगितले. दिग्दर्शक राजामौली यांच्या या वक्तव्यामुळे रजनीकांतचे चाहते खूश झाले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आता तर खुद्द दिग्दर्शक राजामौली यांनीही त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या दोघांची जोडी एखाद्या चित्रपटात एकत्र आल्यास तो नक्कीच सुपरहिट ठरेल.

“सुकेशकडून गिफ्ट घेणारी नोरा फतेही साक्षीदार, मग मी आरोपी कशी?” जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल

सध्या, दिग्दर्शक राजामौली त्यांच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआरच्या यशाचा आनंद घेत आहेत. टॉलीवूड सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर दिग्दर्शक राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने देशभरात चांगला व्यवसाय केला होता. हा चित्रपट २०२२ मधील सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात १२०० कोटींची कमाई केली होती. आता दिग्दर्शक राजामौली महेश बाबूला घेऊन नवीन चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहेत. हा चित्रपट देशभरात रिलीज होईल, असं म्हटलं जातंय.