‘ये है मोहब्बते’मधून दिव्यांकाची एक्झिट?

असा असेल दिव्यांकाचा शेवटचा एपिसोड…

divyanka tripathi
दिव्यांका त्रिपाठी

स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये है मोहब्बते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी. यामध्ये तिने साकारलेली ‘इशी माँ’ची भूमिका लोकप्रिय झाली आणि टीआरपी रेटिंगमध्येही ही मालिका अव्वल आहे. या मालिकेत आतापर्यंत बरेच बदल झाले. जुन्या कलाकारांच्या जागी अनेक नव्या कलाकारांची वर्णी लागली. मात्र, रमन आणि इशिता या दोन व्यक्तिरेखांची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. परंतु इशिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्यांका लवकरच मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे.

मालिकेच्या पुढील भागांमध्ये मुलगी पिहू (रुहानिका धवन) हिचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात आणि काही गुंडांच्या हल्ल्यात इशिता गंभीर (दिव्यांका) जखमी होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू होतो. इतकंच नाही तर रमनच्या (करण पटेल) आयुष्यात एका नव्या स्त्रीची एण्ट्री करण्याच्या विचाराच मालिकेचे निर्माते आहे.

https://www.instagram.com/p/Bb08goNnmwR/

दिव्यांका आणि करणची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यामुळे हे बदल प्रेक्षकांना आवडणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मालिकेतील कलाकार बदलणे, कथानकात अचानक मोठे बदल आणणे या गोष्टी टेलिव्हिजन विश्वासाठी सामान्य आहेत. त्यामुळे इशिताचा पुनर्जन्म झाल्याचे दाखवल्यास नवल वाटायचे काही कारण नाही. सध्या तरी या मालिकेत दिव्यांका पुन्हा एकदा नव्या भुमिकेत दिसणार का, याबाबत कोणतीच माहिती निर्मात्यांकडून देण्यात आली नाही.

https://www.instagram.com/p/BbMChGCnLj_/

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Divyanka tripathi aka ishita quitting yeh hai mohabbatein