टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या स्वप्नव्रत लग्नानंतर पॅरिसमध्ये हनिमुनला गेले आहेत. हे जोडपे लग्नानंतर सुमारे पाच महिन्यांनी हनिमुनला गेले आहेत. दोघंही ख्रिसमस आणि नवीन वर्ष तिथेच साजरे करणार आहे. दोघांनीही नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मालिकेच्या चित्रिकरणामधून सुट्टी घेतली आहे. विवेक आणि दिव्यांका दोघांनीही सोशल मीडियावर आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना विवेकने छानसा मेसेजही लिहिला आहे. सह-कलाकारपासून मैत्रीण, मैत्रिणीपासून आयुष्याची साथिदार आणि आता साथिदारापासून ते फिरण्यासाठीची सोबतीण. चल एकत्र संपूर्ण जग फिरुया..

या फोटोत दोघंही एकत्र नाश्ता करताना दिसत आहेत. विवेकने याआधी काही काळ युकेमध्ये घालवला आहे. दिव्यांकानेही तिचे ऑनस्क्रिन मुलगा आणि मुलगी यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.

दरम्यान, दिव्यांकाच्या एका फॉलोअरने तिचा पती म्हणजेच विवेक याला लोभी असे म्हटले होते. इतकेच नव्हे तर विवेकने फक्त दिव्यांकाची प्रसिद्धी आणि तिच्या पैश्यांकडे पाहून लग्न केले आहे असे तो म्हणाला होता. दिव्यांकाची निवड चुकली आहे. दिव्यांकाने नेहमी तुझ्यावर प्रेम केले. पण तू तिच्यावर कधीच प्रेम केले नाहीस, असे फॉलोअरने म्हटले होते. मात्र, आपल्या फॉलोअरचे हे कृत्य दिव्यांकाला आवडले नाही. तिने जवळपास ६०० कमेन्टमधून ही कमेन्ट शोधून काढली आणि त्यास प्रत्युत्तर दिले होते. दिव्यांकाने अतिशय खडतरं शब्दांमध्ये तिच्या चाहत्याला उत्तर दिले होते. त्यावर एका यूजरने दिव्यांकाला समजावले. पण याही फॉलोअरच्या समजवण्याची पद्धत दिव्यांकाला काही आवडली नाही. त्यालाही दिव्यांकाने तिच्या शैलीत उत्तर दिले होते.

भारतीय टेलिव्हिजन जगतात दिव्यांका ही सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे असेही म्हटले जात आहे. तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली तिची ‘ये है मोहोब्बते’ ही मालिका आजही अनेकांची दाद मिळवत आहे. दिव्यांकाची लोकप्रियता ही फक्त तिच्या ‘इशिमा’च्या भूमिकेपुरतीच मर्यादित नसून तिच्या सोशल मीडियावरील पोस्टसाठीही ती नेहमीच चर्चेत असते.