सध्या टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अमिषा पटेलचा भाऊ आणि अभिनेता अश्मित पटेल याने लवकरच लग्न करणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर आता ‘दिया और बाती हम’ या मालिकेने प्रसिद्धीस आलेला अभिनेता अनस रशिद येत्या १० सप्टेंबरला विवाहबंधनात अडकणार असल्याचे कळते. ‘सूरज’ या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेल्या अनसने ९ एप्रिलला हीना इकबाल हिच्याशी साखरपुडा केला. पंजाब येथील मालेरकोटला या त्याच्या मूळ गावी अगदी खासगी पद्धतीने त्याने साखरपुडा आटोपला होता.

वाचा : नवज्योत सिंग सिद्धूंसोबतच्या वादावर कपिल म्हणतो…

‘इंडियन एक्स्प्रेस’ वेबसाइटला मुलाखत देताना अनसने आपल्या नव्या आयुष्याविषयी आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, घरी सर्वजण माझ्या लग्नासाठी उत्सुक असून, लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. माझे संपूर्ण कुटुंब येथे असल्यामुळे मी मालेरकोटला येथेच लग्न करणार आहे. त्यानंतर आम्ही मुंबईला येऊ तेव्हा, आमच्या मित्रपरिवासाराठी पार्टीचे आयोजन करण्यात येईल.

वाचा : ‘डबल रोल’ साकारणारा पहिला कलाकार कोण माहितीये का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिनासुद्धा अनसच्याच गावची आहे. अनस ३८ वर्षांचा असून, त्याची भावी पत्नी त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. चंदीगढ येथील एका कॉर्पोरेट कंपनीत हिना काम करते. दरम्यान, हे दोघे हनीमूनसाठी कोठे जाणार ते अजून ठरलेले नाही. याविषयी अनस म्हणतो, आम्ही याविषयी अद्याप काहीच ठरवलेले नाही. लग्नाच्या सर्व विधी उरकल्यानंतर आम्ही मुंबईला येणार आहोत. त्यानंतर आमच्याकडे संपूर्ण आयुष्य आहे. तेव्हा आम्ही याविषयी काही ना काही नक्कीच विचार करू.