बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावत सध्या आपल्या ‘क्वीन’ या चित्रपटाच्या यशामुळे सुखावलेली आहे. या चित्रपटातील भूमिकेच्या परिपूर्ण उलटी भूमिका ती आगामी ‘रिव्हॉल्वर राणी’ चित्रपटात साकारत आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक साई कबीर हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
चित्रपटसृष्टीतील पदार्पणातच साईने महिलांवरील आधारित चित्रपट काढण्याचा विचार केला. कारण, त्याला गुरु दत्त आणि बिमल रॉय यांच्या चित्रपटांची आठवण करून देण्याची इच्छा आहे. ‘रिव्हॉल्वर राणी’ या चित्रपटात कंगनाने गँगस्टर मुलीची भूमिका केली आहे. यात ती दबंग आणि सनकी स्वभावाची दिसते. कंगनाच्या चित्रपटात घेण्याबाबत साई किरण म्हणाला की, कंगनाने ती चित्रपटासाठी योग्य निवड असल्याचे सिद्ध केले आहे. सदर भूमिका इतर कोणत्याही अभिनेत्रीने केली असती असे मला वाटत नाही. कारण, तिने साकारलेली अलका सिंग ही अत्यंत बोल्ड व पुरुषी व्यक्तिरेखा असून त्यात अजिबात ग्लॅमर नाही. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून राजकारणावर ब्लॅक कॉमेडीद्वारे भाष्य केले असले तरी त्यात एक प्रेमकथाही दडली असल्याचे कबीर यांचे म्हणणे आहे.
तिग्मांशु धुलियाची निर्मिती असलेला ‘रिव्हॉल्वर राणी’ हा चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont think any other actress wouldve done this role except kangana says director
First published on: 21-04-2014 at 10:34 IST