ड्वेन जॉन्सन हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अभिनयसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ड्वेनला ‘द रॉक’ म्हणून ओळखले जायचे. तो WWE मधील एक सुपरस्टार रेसलर होता. रॉकने चित्रपटात काम करण्यासाठी रेसलिंग सोडली असली तरी शक्ती प्रदर्शन करण्याची त्याची सवय काही सुटलेली नाही. त्याने आपल्या घराबाहेरील लोखंडी दरवाजा चक्क हातांनीच तोडला. या लोखंडी दरवाज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – हे घर आहे की राजवाडा?; पाहा सुझान खानचं कोट्यवधींचं घर
ड्वेन जॉन्सन सध्या ‘ब्लॅक अॅडम’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ड्वेन एका सुपरहिरोची भूमिका साकारत आहे. रुपेरी पडद्यावर सुपरहिरो साकारणारा हा अभिनेता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही सुपरहिरोपेक्षा कमी नाही. त्याला शूटिंवर जाण्यासाठी उशीर झाला होता. त्याच्या घराबाहेरी कुंपणाचा गेट रिमोर्टवर चालतो. परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. अखेर संतापलेल्या रॉकने हातांनीच त्या गेटला तोडून टाकलं. हा व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. रॉकची ताकत पाहून चाहते भारावून गेले आहेत. चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.