प्रियांका चोप्राच्या आगामी बेवॉच या चित्रपटातील सह-कलाकार ड्वेन जॉनसनने इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवरुन प्रियांकाला विशेष संदेश पाठवला आहे. टाईम या मॅगझीनने काल रात्री उशीरा जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील प्रियांका चोप्राची वर्णी लागली आहे. प्रियांकाने आपल्या अभिनयाने जगभरात सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत.
ड्वेन जॉनसनने इंस्टाग्रामवरिल संदेशात प्रियांकाच्या सौर्दयाची आणि अभिनयाची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर प्रियांकासोबत बेवॉच या चित्रपटात काम करायाला मिळाल्याबद्दल ड्वेनने आनंद व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2016 रोजी प्रकाशित
पाहा : प्रियांका चोप्राला कोणी पाठवला विशेष संदेश
इंस्टाग्रामवरिल संदेशात प्रियांकाच्या सौर्दयाची आणि अभिनयाची प्रशंसा केली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-04-2016 at 13:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dwayne johnson writes a message to priyanka chopra