बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दरवर्षी ईदला त्याचा चित्रपट प्रदर्शित करतो. २०१० पासून सलमानने ईदच्या मुहूर्तावर अनेक चित्रपट प्रदर्शित केले आहेत. या वर्षी देखील सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. तसेच अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलण्यात आली आहे. पण सलमानने चाहत्यांसाठी एक खास गिफ्ट देण्याचे ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॉकडाउनमुळे सलमानला रुपेरी पडद्यावर पाहू शकणार नसल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. पण आता सलमानने चाहत्यांना नाराज न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ईदच्या मुहूर्तावर नवा म्यूझिक अल्बम लाँच करण्याचे ठरवले आहे. या अल्बम संदर्भात सलमानने कोणतीही माहितील अद्याप दिलेली नाही. पण ईदला सलमान नवा म्यूझिक अल्बम लाँच करणार असल्यामुळे चाहते आनंदी झाल्याचे दिसत आहे.

२०१० पासून सलमान ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करत आहे. २०१० मध्ये सलमानचा ‘दबंग’ ईदला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली होती. त्यानंतर २०११मध्ये ‘बॉडीगार्ड’, २०१२मध्ये ‘एक था टायगर’, २०१४मध्ये ‘किक’, २०१५मध्ये ‘बजरंगी भाईजान’, २०१६मध्ये ‘सुलतान’, २०१७मध्ये ‘ट्यूबलाईट’, २०१८मध्ये ‘रेस ३’ आणि २०१९मध्ये ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. पण आता ईदच्या मुहूर्तावर सलमान म्यूझिक अल्बम प्रदर्शित करणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eid 2020 surprise from actor to fans is a special music video avb
First published on: 24-05-2020 at 21:48 IST