लैंगिक शोषण, शरीरविक्री, कास्टिंग काउच यांसारखे विषय आता चंदेरी दुनियेसाठी नवे राहिलेले नाहीत. दररोज विविध कलाकार यासंबंधी आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. अमेरिकन चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टिनमुळे हा विषय गेले दोन वर्ष सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपट निर्मात्याविरोधात आतापर्यंत अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या यादित आता एमिली रॅटाकाउस्की हे आणखी एक नवे नाव जोडले गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमिलीने हार्वे विरोधात लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. ती गेल्या अनेक महिन्यांपासून हार्वे विरोधात आवाज उठवत आहे. परंतु तिच्या आरोपांची नोंद कोणीही घेतली नाही. तसेच हार्वेने आरोप केलेल्या सर्व अभिनेत्रींना २५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स देण्याचे वचन दिले होते. या वचनाची त्याने पूर्तता केली नाही. त्यामुळे तिने आता थेट हार्वेचे नावच आपल्या हातांवर गोंदवून घेतले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अनकट गेम्स’ या चित्रपटाच्या प्रिमिअरला एमिलीने हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या एका पत्रकारपरिषदेत तिने हातावर गोंदवलेला हा नवा टॅटू दाखवला. दरम्यान तिने हार्वे वेन्स्टिन विरोधात आपला संताप व्यक्त केला.

गेल्या दोन वर्षात हार्वे विरोधात ४० पेक्षा अधिक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सोशल मीडियावरील ‘# मी टू’ या चळवळीची पहिली सुरुवात हार्वे विरोधातच करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा थेट परिणाम हार्वेच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही मोठय़ा प्रमाणावर झाला. सर्वात प्रथम त्याच्या घटस्फोटित पत्नीने त्याच्याविरोधात कौटुंबिक छळाचा खटला दाखल केला.

पुढे ऑस्कर पुरस्कार वितरित करणाऱ्या अ‍ॅकॅडमीच्या सदस्य पदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली. तसेच जोपर्यंत त्याच्यावर असलेल्या गुन्ह्य़ांमधून तो निर्दोष सुटत नाही तोपर्यंत त्याला कंपनीच्या कोणत्याही पदावर घेतले जाणार नाही. शिवाय त्याच्या ‘द वेन्स्टिन’ या कंपनीने निर्मिती केलेल्या कोणत्याही चित्रपटाला पुढील काही काळ ऑस्कर पुरस्कारांसाठी ग्राह्य़ धरले जाणार नाही. या एकामागून एक त्याच्या विरोधात घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे गेल्या काही दिवसांत त्याला काही कोटी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे. परंतु त्याच्या प्रतिक्रियांवरून ही आलेली संकटे त्याला अपेक्षित होतीच असे दिसते. पण ज्या कंपनीच्या जोरावर त्याने प्रतिष्ठा व आपले आर्थिक साम्राज्य उभारले त्याच कंपनीतील इतर सदस्यांनी त्याच्याविरोधात आर्थिक घोटाळ्यांचे आरोप केल्यामुळे हार्वे पूर्णपणे बिथरला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emily ratajkowski harvey weinstein mppg
First published on: 27-12-2019 at 16:06 IST