इम्रान हाश्मी सध्या दुबईत महेश भट्ट यांच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे आणि तरीही वेळात वेळ काढून तो मुंबईत पोहोचला ते ‘उंगली’ या चित्रपटाच्या प्रमोशनल साँगसाठी. हे गाणे इम्रान आणि सनीवर चित्रित होईल, या योजनेने निर्माते जय्यत तयारीत होते. मात्र, सनीचे नाव ऐकल्यानंतर इम्रानने हे गाणेच करणार नाही, अशी धमकी दिली. मग मात्र निर्मात्यांची तारांबळ उडाली. अखेरीस, सनी ऐवजी श्रध्दा कपूरवर हे गाणे चित्रित करण्यात आले.
फँ टम प्रॉडक्शन्सचा ‘उंगली’ हा चित्रपट बराच काळ रखडला होता. या चित्रपटात इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत असून त्याच्याबरोबर रणदीप हुडा, कंगना राणावत यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक प्रमोशनल साँग करावे, असे निर्मात्यांनी ठरवले. इम्रानचा चित्रपट म्हटल्यावर आयटम साँगमध्ये सनी लिऑन असेल तर गाणे चांगले प्रसिध्दी होईल, असा तर्क लावून सनीची निवड करण्यात आली. मात्र, आपल्याला सनी लिऑनबरोबर कामच करायचे नाही, एखादे गाणेही नाही.. असा हेकाच इम्रानने धरला. अर्थात, इम्रानने सनीबरोबर काम न करण्याचे कारण मात्र सांगितलेले नाही. मात्र, स्वत: इम्रान इंडस्ट्रीत ‘सीरिअल किसर’ म्हणून ओळखला जातो. त्याला लागलेली ही ‘सीरिअल किसर’ची बिरूदावली त्याच्या घरच्यांना अजिबात आवडत नाही. आणि आता एक अभिनेता म्हणून प्रस्थापित झाल्यानंतर इम्रानलाही त्याची ही ओळख नको आहे..
स्वत:च्या प्रतिमेला जपण्याच्या नादात इम्रानने याआधी महेश भट्ट यांचाही राग ओढवून घेतला होता. भट्ट कॅ म्पचा हिरो म्हणून शिक्का बसू नये यासाठी त्याने इतर निर्मितीसंस्थांचेही चित्रपट स्वीकारायला सुरूवात के ली. याच प्रतिमा प्रेमापायी बहुधा त्याने सनी लिऑनबरोबर काम करण्यास नकार दिला असावा. त्यामुळे ऐनवेळी निर्मात्यांनी सनीऐवजी श्रध्दा कपूरची निवड केली. श्रध्दानेही केवळ आयटम साँगसाठी होकार दिला एवढेच नाही तर श्रध्दाने या गाण्यावर अप्रतिम नृत्य केले असल्याचे बोलले जाते. बॉलिवूडमध्ये एकाचा तोटा हा दुसऱ्याचा लाभच असतो तो असा..
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2014 रोजी प्रकाशित
सनी लिऑनी.. नको रे बाबा
इम्रान हाश्मी सध्या दुबईत महेश भट्ट यांच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे आणि तरीही वेळात वेळ काढून तो मुंबईत पोहोचला ते ‘उंगली’ या चित्रपटाच्या प्रमोशनल साँगसाठी.
First published on: 26-10-2014 at 09:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emraan hashmi says no to sunny leone