एपिक चॅनेलवरील ‘लॉस्ट रेसिपीज’ या लोकप्रिय मेजवानी शोच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरूवात होणार आहे. प्रख्यात लेखक आणि सेलिब्रिटी शेफ आदित्य बाल या पर्वासाठी देशभरात दौरा करणार आहे. या शोमध्ये कालांतराने विसरलेल्या वेगवेगळ्या पाककलांना पुन्हा एकदा नव्याने उजाळा देण्यात येणार आहे. येत्या जून महिन्यात हे दुसरे पर्व सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लॉस्ट रेसिपीज’च्या दुसऱ्या सिझनमध्ये दहा एपिसोड पाहायला मिळणार आहेत. यावेळी हंपी, विझाग, दार्जिलिंग, बोधगया व महाराष्ट्र या ठिकाणच्या वेगवेगळ्या पाककला पाहायला मिळणार आहेत. याबाबत आदित्य बालने सांगितले की,’ पहिल्या सिझनचा अनुभव अप्रतिम होता. त्यावेळी वेगवेगळ्या चविष्ट पाककला पाहिल्या होत्या. एक शेफ म्हणून मला नेहमीच वाटते की इतिहास व पारंपारिक पदार्थ जास्त इंटरेस्टिंग असतात. सिझन २मध्ये देखील वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळतील.’

एपिक वाहिनीवर वेगवेगळे आणि प्रभावी फूड शोज आहेत. ‘त्यौहार की थाली’ हा फूड शो आहे, ज्याचे सूत्रसंचालन साक्षी तंवर करते. या शोमध्ये भारतात सणांमध्ये बनणाऱ्या पदार्थांची रेसिपी दाखवण्यात येते. ‘राजा रसोई और अन्य कहानियां’ या फुड ट्रॅव्हेल शोमध्ये सेलिब्रेटी शेफ रणवीर ब्रार वेगवेगळे व चविष्ट पदार्थ दाखवतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epic channel to bring back lost recipes for second season in june read details
First published on: 30-03-2019 at 18:32 IST