बॉलिवूड अभिनेत्री इशा देओल लवकरच आई होणार आहे. इशा आणि भरत तख्तानी यांचे हे पहिलेच बाळ आहे. इशाच्या बेबी शॉवरचे काही सुरेख फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यावेळी इशा आणि भरत पुन्हा एकदा विवाहबद्ध झाले. इशाचे बेबी शॉवर कशापद्धतीने होईल याबद्दल अनेकांनाच उत्सुकता होती. दोघेही पुनर्विवाह करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंधी पद्धतीने इशा आणि भरतचा पुनर्विवाह पार पडला. यावेळी देओल कुटुंब, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते. हेमा मालिनी, जया बच्चन, डिंपल कपाडिया आणि रश्मी ठाकरे इशाच्या बेबी शॉवरला हजर राहिल्या. यावेळी इशाची बहिण आहाना देओलसुद्धा पती वैभव वोहरासोबत उपस्थित होती. संपूर्ण देओल कुटुंबासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. फॅशन डिझायनर निता लुल्लाने डिझायन केलेल्या लाल आणि गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये इशा खूपच सुंदर दिसतेय. इशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेबी शॉवरपूर्वीचा एक फोटोही पोस्ट केला.

वाचा : …म्हणून अक्षय आणि भूमीने स्वत:भोवती टॉयलेट पेपर घेतलं गुंडाळून

काही दिवसांपूर्वीच इशाने ‘मॅटर्निटी फोटोशूट’चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ग्रीसमध्ये ईशा आणि भरत यांनी हा फोटोशूट केला होता. दरम्यान अभिनेत्री सोहा अली खानचाही बेबी शॉवर नुकताच करण्यात आला. बेबी शॉवरचा कार्यक्रम पूर्ण होताच सोहाने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त केला होता. आपल्या आयुष्यातील या खास दिवसाचे काही फोटोही तिने शेअर केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Esha deol baby shower photos tied the knot once again with bharat takhtani
First published on: 24-08-2017 at 20:58 IST