‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे इशा गुप्ता. अनेकदा सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केल्यामुळे इशा चर्चेत असते. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक बाथरुममधील सेल्फी शेअर केला होता. त्यानंतर तिने पुन्हा एकदा असाच बोल्ड फोटो शेअर केला आहे.

बाथरुम सेल्फीमुळे चर्चेत आलेल्या इशाने यावेळी बेडरुममधील हॉट फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चर्चा रंगली असून चाहत्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)


इशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. त्यावर तिने लेसी श्रग घेतला आहे. हा फोटो शेअर करत प्रकाश पोहोचवण्याचे दोन मार्ग आहेत…एक मेणबत्ती आणि दुसरा आरसा, असं कॅप्शन तिने दिलं आहे.

वाचा : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला बाथरुममधील बोल्ड फोटो

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इशाने तिचा बाथरुममधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे बऱ्याचवेळा इशाला ट्रोल व्हावं लागतं. इशा ‘जन्नत 2’, ‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’, ‘बादशाहो’ या सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. तसंच येत्या काळात ती दोन चित्रपट आणि तीन वेब सीरिजमध्ये देखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.