बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे आयशा जुल्का. नुकताच आयशा यांनी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. आयशा यांच्यासोबत जूही चावला देखील शोमध्ये हजर होती. दरम्यान आयशा यांच्या सोशल मीडिया पोस्टवरील कमेंट वाचून दाखवण्यात आल्या.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरील कमेंट वाचून दाखवण्यात येतात. शोमधील या भागाला ‘पोस्ट का पोस्टमार्टम’ असे नाव देण्यात आले आहे. आयशा जुल्का यांनी काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्या त्यांच्या मांजरीसोबत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

एका यूजरने कमेंट करत ‘म्याऊ म्याऊ तर मी पण करतो, मला ही तुमच्या कुशीत घ्या’ असे म्हटले होते. तर दुसऱ्या एका यूजरने ‘त्यांना मांजर आवडतात, गाढव नाही’ असे म्हटले आहे. या कमेंट पाहून आयशा यांना हसू अनावर झाले आहे आणि दुसऱ्या यूजरची कमेंट वाचून ‘खरं बोललात, अगदी खरे’ असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयशा जुल्काने ‘खिलाडी’ आणि ‘जो जीता वही सिंकदर’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जीनियस’ या चित्रपटात शेवटचे काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.