अभिनेत्री ते राजकीय नेत्या असा प्रवास करणाऱ्या तामिळनाडूतील काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. सोमवारी खुशबू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला होता. त्यांच्या या निर्णयावर अभिनेत्री फराह खान अली हिने नाराजी व्यक्त केली. काही लोक इतक्या लवकर कसे बदलतात? असा सवाल तिने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – “आरे कारशेड सर्व मुंबईकरांची समस्या नाही”; कंगना रणौतचा उद्धव ठाकरेंना टोला

“कदाचित हे ट्विट चुकीचं वाटतंय. पण काही दिवसांपूर्वी आपण ज्या पक्षावर जोरदार टीका करत होता. आज तुम्ही त्याच पक्षात प्रवेश केला आहे. लोक इतक्या लवकर कसे बदलतात?” अशा आशयाचं ट्विट करुन फराहने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ऑनस्क्रीन ‘नागिन’चा बोल्ड अंदाज; पाहा मौनी रॉयचं हॉट फोटोशूट

गेल्या कित्येक दिवसांपासून खुशबू सुंदर यांच्या भाजपा प्रवेशाविषयी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. याचदरम्यान त्या रविवारी दिल्लीत गेल्या आणि त्यानंतर त्यांनी सोमवारी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. विशेष म्हणजे या राजीनाम्यासोबत त्यांनी एक पत्रदेखील सोनिया गांधी यांना दिलं असून त्यात पक्षातील काही वरिष्ठांवर आरोप केले आहेत. २०१४ पासून त्यांचा काँग्रेसमध्ये सक्रीय सहभाग होता. मात्र, आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसंच तामिळनाडूमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farah khan ali on congress spokesperson khushboo sundar enter in bjp mppg
First published on: 12-10-2020 at 18:44 IST