दिग्दर्शक, निर्माता फरहान अख्तरने नुकतान सलमान खानची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर अनेक निष्कर्ष लावण्यात आले आहेत. सलमान आणि फरहान एकत्र चित्रपटात काम करणार की सलमानच्या चित्रपटाची निर्मीती किंवा दिग्दर्शन फरहान करणार अशा अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. आता या सर्व चर्चांवरचे मौन फरहानने सोडले आहे. त्याने सलमानच्या घरी जाण्यामागचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फरहानचे सलमानच्या घरी जाण्यामागे काही विशेष कारण नसल्याचे सांगितले. सलमान आणि फरहान हे कौटुंबीक मित्र आहेत. ते दोघे अनेकदा भेटतच असतात. तसेच फरहानचा सलमानसह चित्रपट करण्याचा विचार नसल्याचेही फरहानने सांगितले. फरहानने सलमनला भेटून काही कल्पनांवर  फक्त चर्चा केली असल्याचेही सांगितले आहे. सलमान खानचे वडिल सलीम खान आणि फरहान अख्तरचे वडिल जावेद अख्तर यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता सलमान आणि फरहान या जोडीने एकत्र काम केल्यास सलीम-जावेदची दुसरी पीठी एकत्र पाहायला मिळणार आहे. चाहते त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी फार आतुर आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार सध्या फरहान राकेश ओमप्रकाश मेहरासह ‘तूफान’ चित्रपटात काम करणार आहेत. हा एक क्रिडा क्षेत्रातील एका व्यक्तीशी निगडीत चित्रपट आहे. या चित्रपटाआधी फरहानने राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासह ‘भाग मिल्खा भाग’ हा बायोपिक केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farhan akhtar and salman khan is not going to work together in next movie
First published on: 08-05-2019 at 16:20 IST