‘हो’, ‘नाही’ म्हणत अखेर फरहान अख्तरनं शिबानी दांडेकरसोबत आपल्या नव्या नात्याला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडवून ठेवलेलं आपलं नातं अखेर इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून दोघांनीही स्वीकारलं आहे. गेल्या काही दिवसांपासून फरहान शिबानीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्यानं अस्वस्थ झालेल्या शिबानीनं फरहानसोबतचं आपलं नातं नाकारलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण नुकतंच फरहाननं शिबानीसोबतचा फोटो शेअर करत एकप्रकारे आपल्या नात्याला दुजोरा दिला आहे. २०१७ मध्ये फरहाननं पत्नी अधुना अख्तरसोबत घटस्फोट घेतला. अधुना अख्तर ही सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट आहे. अधुनानंतर फरहानचं नाव श्रद्धा कपूरसोबत जोडलं गेलं. मात्र फरहान सोबतचं श्रद्धाचं नातं शक्ती कपूर यांना मान्य नव्हतं, म्हणूनच फरहान श्रद्धाचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा फरहान आणि शिबानीला एकत्र पाहिलं गेलं. एकमेकांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ते झळकले होते. अखेर हो नाही करत दोघांनीही एकमेकांवरचं प्रेम कबुल केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farhan akhtar shibani dandekar confirmed their relationship with each other
First published on: 16-10-2018 at 12:22 IST