जागतिक स्तरावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सौंदर्य स्पर्धांपैकी एक म्हणजे मिस इंडिया. बुद्धिमत्ता आणि सौंदर्य याची सुरेख सांगड घालत देशाच्या कानाकोपऱ्यातील सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी होतात. अशीच एक स्पर्धा मुकतीच मुंबईत पार पडली. ५४ व्या फेमिना मिस इंडियाच्या दिमाखदार अंतिम सोहळ्यामध्ये हरियाणाच्या मानुषी चिल्लरने यश मिळवलं आहे. मानुषीचं नाव जाहिर होताच मागील वर्षी विजेती ठरलेल्या प्रियदर्शिनी चॅटर्जीने तिच्या डोक्यावर मिस इंडियाचा मुकुट घातला. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत जम्मू- काश्मीरच्या सना दुआने दुसरं तर बिहारच्या प्रियांका कुमारीने तिसरं स्थान पटकावलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरियाणाच्या मानुषीने या स्पर्धेत मिस इंडियाचा किताब पटकावल्यामुळे सध्या तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मानुषीचे आई- वडील डॉक्टर असून तिचं शिक्षण दिल्लीच्या सेंट थॉमस स्कूल आणि सोनीपतच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज फॉर वुमन मधून झालं आहे. हरियाणामध्ये तिने ‘मिस हरियाणा’ हा किताबही पटकावला होता. मानुषीचं नाव जाहिर होताच मागील वर्षी विजेती ठरलेल्या प्रियदर्शिनी चॅटर्जीने तिच्या चेहऱ्यावर मिस इंडियाचा मुकुट घातला. येत्या काळात चीनमध्ये होणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेत मानुषी भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे. मिस इंडियाच्या पुरस्कारासोबतच ती मिस फोटोजेनिकसुद्धा ठरली आहे.

मिस इंडिया या स्पर्धेत विनाली भटनागर हिला ‘मिस अॅक्टिव्ह क्राऊन’ आणि वामिका निधीला ‘बॉडी ब्युटिफूल’ या खास पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. मिस इंडियाच्या या स्पर्धेदरम्यान सहभागी सौंदर्यवतींनी नव्या रुपरेषेनुसार देशातील ३० राज्यांना भेट दिली होती. त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड या राज्यांसह इतरही राज्यांतील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेले कपडे घातले होते. अशा या दिमाखदार सोहळ्याचा अनुभव प्रेक्षकांनाही लवकरच घेता येणार आहे. ९ जुलैला हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion gamour miss haryana winner manushi chillar crowned as the miss india world
First published on: 26-06-2017 at 15:46 IST