उद्या १८ जून ही तारीख जागतिक पितृ दिन अर्थात फादर्स डे म्हणून साजरी केली जाते. या दिवसाचं औचित्य साधून अनेक सेलिब्रिटी आपले वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर एका खास मेसेजसोबत शेअर करतात. गेल्या वर्षीही अनेक कलाकारांनी त्यांच्या बाबांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यातले काही निवडक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल.

अरबाझ खानने त्याच्या सोशल मीडियावर सलमान, सोहेल आणि बाबा सलीम खान यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. यावेळी अरबाझने वडिलांचे त्याचा सर्वात जवळचा मित्र असल्याबद्दल आभार मानले होते.

शाहरुख खानसाठी फादर्स डेच्या शुभेच्छा देणारं खास अब्रामने एक ग्रिटींग बनवले होते. त्याचे हे ग्रिटींग गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते.

श्रद्धा कपूरनेही शक्ती कपूर यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. माझे बाबा सर्वोत्कृष्ट आहेत. बापु, फादर्स डेच्या शुभेच्छा असा खास मेसेजही तिने लिहिला होता.

सुश्मिता सेनने गेल्यावर्षी हा दिवस तिच्या बाबांसोबत आणि दोन मुलींसोबत साजरा केला होता. तिने फोटोंचे कोलार्ज करून शेअर केले होते. या फोटोसोबत सुश्मिताने वडिलांचे भरभरून कौतुक केले होते.

अनुष्काने तर तिच्या बालपणातलाच फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिच्या बाबांनी तिला हातात उचलून धरलं होतं. माझा खरा हिरो, ज्यांच्याकडून मला नेहमीच प्रेरणा मिळते. बाबांमुळेच आज मी जे काही आहे ते बनू शकले. सगळ्याच वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा.

फरहान अख्तरनेही आपल्या वडिलांसोबतच म्हणजे जावेद अख्तर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘अशा माणसाला फादर्स डेच्या शुभेच्छा ज्याने नेहमीच मला प्रोत्साहित केलं आहे. ‘

फादर्स डेच्या दिवशी इरफान खान आपल्या लहान मुलाला अयानला घेऊन गेल्या वर्षी साबरमती आश्रममध्ये गेला होता. यावेळी त्याने देशाच्या बापूसोबत आणि माझ्या मुलासोबत फादर्स डे साजरा करत असल्याचे म्हटले होते.

रणवीर सिंग नेहमीच काही ना काही वेगळं करण्यासाठी ओळखला जातो. त्रिदेव.. ३ पिढ्या.. फादर्स डेच्या शुभेच्या असे अनोखे कॅप्शन त्याने त्याच्या फोटोला दिले होते.

रितेश देशमुखने गेल्या वर्षी हा पूर्ण दिवस आपल्या मुलासोबत घालवला होता. यावेळी जेनेलिया देशमुखने बाप-लेकाचा फोटो शेअर केला होता. माझं पहिलं प्रेम, माझं हृदय, माझं आयुष्या असं अनोख कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं.

शिल्पा आणि शमिता शेट्टी या दोन्ही बहिणींनी आपल्या वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. सर्वोत्कृष्ट बाबा असण्यासाठी तुमचे खूप आभार असा मेसेजही त्यांनी लिहिला होता. पण काही महिन्यांपूर्वी या दोघींना पितृशोक झाला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी फादर्स डे फारच भावूक करणारा असेल.
