रंगभूमीचा पाया समजल्या जाणाऱ्या एकांकिका या नाटय़प्रकारात मराठी रंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग होत असतात. या प्रयोगांचे मूल्यमापन एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून होतच असते. परंतु एकांकिका सादर करणाऱ्या मंडळींना कोणत्याही स्पर्धेविना एकत्र आणून त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा ‘अस्तित्व- पारंगत सन्मान’च्या रूपाने गौरव करण्याचे ‘अस्तित्व’ या प्रायोगिक नाटय़संस्थेने ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००९ पासून सुरू झालेल्या या उपक्रमात सन्मानित झालेले अनेक रंगकर्मी आज नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या क्षेत्रांत नावलौकिकप्राप्त झाले आहेत. ‘पारंगत सन्मान’अंतर्गत गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सादर झालेल्या एकांकिकांमधून सवरेत्कृष्ट एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य आणि संगीत या विभागांसाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. खुल्या आणि महाविद्यालयीन या दोन्ही गटांसाठी हे पुरस्कार असतील. रविवार, २४ फेब्रुवारी रोजी मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. पारंगत सन्मान पुरस्कारांसाठी १ फेब्रुवारी २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान प्रथम पुरस्कारप्राप्त एकांकिका तसेच वैयक्तिक स्वरूपातील प्रथम पारितोषिक प्राप्त करणारे कलावंत व तंत्रज्ञ पात्र असतील. या पुरस्कारासाठीचे प्रवेश अर्ज http://www.astitva.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी संपर्क- मोबाईल क्र. ९८२१०४४८६२. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी आहे. पुरस्कारांची नामांकने १७ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: February astitva one act play competition ceremony was held
First published on: 13-01-2019 at 00:23 IST